Published On : Mon, Mar 16th, 2020

मा. कांशीराम साहेबांची जयंती साजरी

कन्हान : – सत्य शोधक संघ कन्हान व्दारे बहुजन नायक मा. कांशीराम साहेबांची जयंती आंबेडकर चौकात साजरी करण्यात आली.

राजेश फुलझले यांच्या हस्ते कांशीराम साहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. याप्रसंगी रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम हयांनी मा. कांशीराम यांच्या जीवन वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरि कांनी मा कांशीराम साहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून अभिवादन केले.

सुत्रसंचालन सोनु मसराम यांनी तर आभार शरद वाटकर यांनी व्यकत केले. कार्यक्रमास मनिष भिवगडे, सतीश भसारकर, बंटी सहारे, अंकित सहारे, नितिन मेश्राम, चंन्द्रशेखर वंजारी सह नागरिक उपस्थित होते.