Published On : Mon, Jun 10th, 2019

वादळी वा-याने घरांचे छत उडुन सवादोन लाखाचे नुकसान

Advertisement

कन्हान : – मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आलेल्या जोरदार वादळी वा-या पावसाने खेडी, बोरी व गहुहिवरा येथील शेतकऱ्याच्या घरांचे छत उडुन सवादोन लाखाचे नुकसान झाले.

शुक्रवार (दि.७) ला दुपारी २.३० वाजता दरम्यान म्हणजेच मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आलेल्या जोरदार वादळी वा-याने शेतकऱ्यांच्या राहत्या घराचे छत, सिमेंट सिट उडुन नुकसान झाले. यात आपत्तीग्रस्त खेडी येथील
१) प्रकाश पुंडलिक चिंचुलकर – २२६०० रू
२) महादेव सोमा चौधरी – २५००० रू
३) चंद्रशेखर मोतीराम चौधरी – १४००० रू
४) चंद्रशेखर नारायण मरसकोल्हे – ६०००रू
५) देविदास सोमा सहारे ७८०००रू
६) प्रभु लछीराम मनगटे – २००० रू
७) घनश्याम आंनदराव घरजाळे – ८००० रू
८) रविकांत सिताराम महल्ले – ८००० रू
९) शंकर नथु बांगळे – ७०००रू
१०) महादेव बाबुराव बोरकर – १२००रू
११) टिकाराम रामाजी गजबे – ८४०० रू

बोरी (राणी) चे
१) नथु रामाजी ठाकरे – १४५००रू
२) शंकर सिंगर उके १५००० रू गहुहिवरा चे चंद्रभान महादेव मेश्राम – १०५०० रू यांच्या सह तिन्ही गावातील १५ शेतकऱ्याचे छुटमुट नुकसान झाल्याने एकुण अंदाजे सवादोन लाखाचे नुकसान झाले आहे. खेडी च्या तलाठी शितल गौर यांनी त्यांच दिवसी व शनिवारला मौका चौकसी करून खेडीचे ११ घर, बोरी (राणी) चे २ व गहुहिवरा येथील एका घराचे असे एकुण २,२७,७०० रूपयांचे नुकसान झाल्याचा लेखी अहवाल मा. तहसिलदार वरूण सहारे हयाना सादर करण्यात आला आहे. या वादळी वा-या ने शेतकऱ्यांच्या राहत्या घराचे व अन्न धान्याचे नुकसान झाले असल्याने शासनाने त्वरित नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत करावी अशी मागणी समस्त गावक-यांनी केली आहे.