Published On : Sat, Aug 24th, 2019

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विंग्स किंडरगार्टेनमध्ये दहिहंडी उत्सव

नागपूर,: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रहाटे कॉलनी येथील विंग्ज किंडरगार्टेन कॉन्व्हेंटमध्ये शनिवारी (ता.२४) दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कॉन्व्हेंटमधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये दहीहंडी उत्सव सहभागी घेत श्रीकृष्णाच्या बाललीला सादर केल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थर लावून दहीहंडी फोडली व संगीताच्या तालावर ठेकाही धरला.

विंग्ज किंडरगार्टेन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका मीना उधोजी व व्यवस्थापक नितीन उधोती यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमाला कॉन्व्हेंटमधील अर्चना दरभा, मंदा बनकर, दिप्ती जोशी, वनिता हस्तक, कविता देवाईकर, उर्वशी काटनकर, मंजू लघाटे, गौरी धामनकर, पूनम सावडीया, अश्वीनी राजनकर, सरीता गहारवार यांच्यासह विंग्ज किंडरगार्टेन कॉन्व्हेंटचे सर्व बालगोपाल विद्यार्थी उपस्थित होते.