Published On : Sat, Aug 24th, 2019

रेशीमबाग मैदानावर पुन्हा आनंद मेळाव्यासाठी खोदकाम

नागेश सहारे देणार आयुक्तांना निवेदन

नागपूर : खेळाचे मैदान असतानाही उत्सवाच्या निमित्ताने आनंद मेळाव्यासाठी मैदान उपलबद्ध करून देण्यात येत असल्यामुळॆ क्रीडा प्रेमींनी त्याचा विरोध केला आहे. नगरसेवक नागेश सहारे यांच्याकडे क्रीडा प्रेमींनी कैफियत मांडली असून यासंदर्भात स्वतः नगरसेवक नागेश सहारे आयुक्तांना निवेदन देणार आहेत.

Advertisement

क्रीडा प्रेमींनी आनंद मेळाव्यावर आक्षेप घेतल्यानंतर नगरसेवक नागेश सहारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके तसेच नासुप्रच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली. जनक्षोभ भडकण्यापूर्वी परवानगी रद्द करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. उद्या यासंदर्भात ते निवेदन देणार आहेत.

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement