Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दहेगावातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का अड्ड्यावर छापा, १९ ग्राहकांसह व्यवस्थापकावर गुन्हा

Advertisement

नागपूर : शहरात अवैध हुक्का पार्लरविरोधात नागपूर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या भूमाफिया विरोधी पथकाने खापरखेडा आणि कोराडी पोलिसांसोबत संयुक्त धाड टाकत दहेगाव येथील ‘हॉटेल बिहाइंड द लेक’मध्ये सुरू असलेला अवैध हुक्का अड्डा उद्ध्वस्त केला. कारवाईदरम्यान १९ ग्राहक हुक्क्याचा आस्वाद घेत असल्याचे आढळून आले, तर हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलैच्या मध्यरात्री गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोन विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता, व्यवस्थापक सोहेल कमरुद्दीन अन्सारी (वय २६, रा. वलनी, ता. सावनेर) हा शासनाने प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का १९ ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का पॉट, विविध फ्लेव्हरचा तंबाखू आणि इतर साहित्य असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २७२ तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (COTPA) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी खापरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या भूमाफिया विरोधी पथक, खापरखेडा आणि कोराडी पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.