Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘वाढदिवसाचे आमिष, चिमुकलीवर अश्लील कृत्य’; २०० सीसीटीव्ही तपासून हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : “वाढदिवसाची पार्टी कुठे आहे?” या बहाण्याने ८ वर्षीय चिमुकलीला जाळ्यात ओढून तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला हुडकेश्वर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. तब्बल २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला हिंगणा परिसरातून जेरबंद केले. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला असून पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजता पीडित ८ वर्षीय मुलगी मैत्रिणीला बोलवण्यासाठी तिच्या घरी जात होती. त्यावेळी एका अनोळखी तरुणाने “वाढदिवसाची पार्टी कुठे आहे?” असे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने चिमुकलीशी अश्लील कृत्य करून मोपेडवरून घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी अनोळखी असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ओंकारनगर, जयप्रकाश नगर, जयताळा, हिंगणा रोड परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अनेक दिवसांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपीची ओळख पटली.

Advertisement

अखेर पोलिसांनी सापळा रचून कुबेर पोहाने (वय २०) याला हिंगणा परिसरातून अटक केली. त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, याबाबत पालकांनी मुलांना सतत जागरूक करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.