Published On : Fri, Jun 12th, 2020

दादाजी खोब्रागडे यांचा मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा – जयंत पाटील

मुंबई – सुप्रसिद्ध कृषी संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करून तांदळाचे नवीन नऊ वाण शोधले होते. या अत्यंत बुद्धिमान कृषी संशोधकाचे निधन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झाले. स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांचा योग्य सन्मान व्हायला हवा. म्हणून त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारकडे करून या कृषीरत्नाचा योग्य सन्मान करावा असे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement