Published On : Wed, Sep 25th, 2019

चार चार तास चिखलात रांगेत उभे राहुन मिळते सिंलेडर

कन्हान : – परिसरातील नागरिकांना गँस सिंलेडर आणण्या करिता दलदल व चिखलात चार चार तास रांगेत उभे राहुन सिलेंडर मिळत असल्याने नागरिकांत तिव्र संताप व्यकत करण्यात येत आहे.

भारत सरकार च्या धुळ मुक्त स्वयं पाक घर करण्याकरिता सर्व नागरिकांना गँस सिलेंडर चा उपयोग करण्यास सुरु वात करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत गोरगरीबाना सुध्दा प्रवृत्त करण्यात आले. यामुळे गँस सिंलेडरचे ग्राहक मोठय़ा प्रमाणात वाढले.

त्या प्रमाणात सिंलेडर वितरण संस्था च्या वितरण प्रणालीत वाढ न करण्यात आल्याने नागरिकांना सर्व कामधंदा सोडुन धावपळ करून गँस भरलेले सिंलेडर आणण्याकरिता भंयकर त्रास सहन करावा लागतो. कन्हान शहर व परिसरातील १५ ते २० गावाकरिता एच पी गँस सिलेंडर वितरण केंद्र महामार्ग लगत कपुर एण्ड सन्स गोडाऊन कन्हान येथे आहे.

येथेच सल्फेट चे गोडाऊन असुन मालवाहु जड ट्रक वाहनाच्या ये-जा ने झालेल्या दलदल व चिखलात सकाळी ६ वाजता पासुन नागरिकांना रांग लावुन १० वाजता सिंलेडर ची गाडी आल्यावर नंबर लागल्यावरच सिंलेडर मिळत असल्याने भंयकर त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रशासनाच्या संबंधित विभागाने त्वरीत लक्ष केंद्रित करून सिलेंडर वितरण केंद्राची किंवा सिंलेडर ची संख्या वाढवुन सुरळीतपणे व्यवस्था करण्यात यावी. तसेच नागरिकांना घरपोच सिंलेडर मिळण्याची व्यवस्था झाल्यास नागरिकांना सिंलेडर घेण्या करिता वेळेची बचत व होणा-या पासुन मुक्तता मिळेल.