Published On : Wed, Sep 25th, 2019

कनिष्ठ अभियंत्याने उडी मारून केली आत्महत्या

खपरखेड्याच्या प्रकाश नगर वसाहतीत घटना

कामठी :-खापरखेडा प्रकाश नगर वसाहतीत असणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याने वसाहतीच्या टेरेसवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

शुभम रमेश सबलोक 37 रा. D टाईप 68/1 प्रकाश नगर वसाहत खापरखेडा असे मृतक कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.तो अविवाहित असून 210 मेगावॅट औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कनिष्ठ अभियंता या पदावर होता त्याला लकवा मारल्याने आजाराने ग्रस्त होता.

त्यामुळे मागील एक महिन्यापासून तो ड्युटीवर नसल्याची माहिती मिळाली. घटनेदरम्यान आई, वडील व मृतक तिघेही घरी होते. मृतकाने आईवडीलांना बाहेरुन येतो असे सांगून क्वार्टचा बाहेरुन दरवाजा लावून टेरेसवर जाऊन झिरो मीटरवर उडी घेतली.

लागलीच त्याच्या आईवडिलांनी शेजार्‍यांना आवाज देऊन बाहेरून दरवाजा खोलण्यास लावले व दरवाजा खोलून त्याच्या शोधा शोध घेतला असता गॅलरीतून बघितले असता झिरो मिटरवर रक्तबंबाळ होऊन मृतावस्थेत आढळून आला.

लागले खापरखेडा पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली असून खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व पंचनामा करून परंपरेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. खापरखेडा पोलीस निरीक्षक मदने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निमगडे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जळते, रेवतकर पुढील तपास करीत आहे.

संदीप कांबळे कामठी