
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वैध पोलीस कोठडीतून पळून गेलेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (वय २५, रा. तिरोडा) याला तिरोडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत शिताफीने अटक केली आहे. आरोपीच्या पलायनानंतर त्याचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस ताब्यातून फरार झाल्याची माहिती मिळताच तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. आरोपी लपण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणी पाळत ठेवण्याचे आदेश देत पोलिसांनी जाळे विणले. त्यानंतर तिरोडा पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पुन्हा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात येत आहे.
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...
सत्तापक्ष नेता की अनुपस्थिति से सभा स्थगित #vidarbhanews #nagpur #newsupdates #vidarbha #nagpurtoday
विदर्भ में 26 प्रतिशत वर्षा की कमी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurtoday




