Published On : Sat, May 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

गुगल मॅपवरून फक्त दोन तासांत एलओसी ओलांडली; नागपुरातील सुनिता जामगडेच्या चौकशीत खळबळजनक खुलासा

Advertisement

नागपूर: पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरची रहिवासी सुनिता जामगडे हिने युद्धजन्य स्थितीत फक्त दोन तासांत नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून थेट पाकिस्तानात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्फाच्छादित डोंगर, दरी व नद्या पार करत ती पाकिस्तानात पोहोचली. मात्र, काही अंतरावर पाक रेंजर्सनी तिला ताब्यात घेतले.

ही घटना १४ मे रोजी घडली. पाकिस्तानी रेंजर्सनी तिला नियंत्रण रेषा पार करताना अटक केली. सुनिताचा दावा आहे की, ती गिलगिट येथील झुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी निघाली होती, ज्याच्याशी तिचा स्टोन व्यवसायात संपर्क होता. गुगल मॅपचा वापर करून तिने प्रवासाचा मार्ग शोधला आणि कारगिलजवळ आपल्या मुलाला सोडून ती एकटीच पुढे निघाली. वाटेत पडल्यामुळे तिला दुखापत झाली, तरीही ती थांबली नाही आणि अखेर पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सुरुवातीला पाक रेंजर्सनी याला गांभीर्याने घेतले नाही, पण प्रकरण वरिष्ठ स्तरावर गेल्यावर सैन्याने कारवाई केली. सुनिताला डोळ्यांवर पट्टी बांधून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आणि तिथे अनेक दिवस तिची चौकशी झाली. भारतीय गुप्तचर संस्थांना अद्याप ती कोणतीही संवेदनशील माहिती शेअर केल्याचे पुरावे सापडलेले नाहीत, परंतु पोलिसांचा संशय अद्याप कायम आहे.

सुनिताच्या बँक खात्यांची तपासणी केली असता, काही भारतीयांकडून तिला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर झाल्याचे उघड झाले आहे. आता हे व्यवहार नेमके कशासाठी झाले याचा तपास सुरू आहे. तसेच, २ मे रोजी तिने मानसिक उपचारासाठी कागदपत्रे तयार केली आणि ४ मे रोजी ती अमृतसरला रवाना झाली. तिच्या या घाईगडबडीच्या हालचालींवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सुनिताचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणे केवळ व्यवसायिक कारणासाठी होते का? की यामागे आणखी काही मोठा हेतू लपलेला आहे? याचा तपास गुप्तचर संस्था व पोलीस यंत्रणा करत आहेत.

Advertisement
Advertisement