Published On : Tue, Dec 11th, 2018

नागपुर टुडे ईम्पैक्ट : अधिवक्ता धवड दाम्पत्य चा तपास अपराध शाखेकडे, 137 दिवसापासून लापत्ता

अजनी पोलिसांकडे कुठला ही सुगाव नाही।
हत्या – आत्महत्या – याच्यावेतिरिक्त अधिक काय ?
घटनेचे गांभीर्य बघुन घात पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही

नागपूर: शहरातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. भैयासाहेब धवड आणि त्यांची पत्नी वनिता गेल्या 137 दिवसांपासून बेपत्ता असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अचानक बेपत्ता झालेल्या धवड दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी अजनी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास चालविला होता, परंतु त्यांना यश आले नाही ,धक्कादायक बाब म्हणजे नावाजलेले वकील असलेले भैयासाहेब आणि त्यांची गृहिणी पत्नी वनिता घर सोडताना अंगावरच्या कपड्यांशिवाय कोणतीही वस्तू सोबत घेऊन गेलेले नाहीत. सर्व ओळखपत्र, एटीएम कार्ड्स, बँक पासबुक, कपडे, चप्पल एवढंच काय तर चष्मे आणि रोज आवश्यक असलेली औषधंही घरीच ठेवून हे दाम्पत्य अज्ञात ठिकाणी निघून गेल्याने नागपुरात खळबळ माजली आहे.

अपघातासंदर्भात विमा क्लेम्ससाठीचे नागपुरातील प्रख्यात वकील भैयासाहेब धवड (वय 62 वर्ष) आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड 29 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता आहेत. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत वंजारीनगर परिसरातील लक्ष्मी प्रयाग अपार्टमेंटमध्ये गेल्या 14 वर्षांपासून राहणारे हे दाम्पत्य सर्वांचे आवडते शेजारी होते. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे निर्व्यसनी भैय्यासाहेब आणि वनिता धवड 29 जुलैच्या संध्याकाळपर्यंत अपार्टमेंटमध्ये सर्वांना दिसले. मात्र, 29 जुलैच्या रात्री कोणाला काहीही न सांगता हे दाम्पत्य बेपत्ता झालं. ही घटना घडली त्या दिवशी धवड दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा मृणाल (वाशिमला बँकेत नोकरी करतो) नागपुरातील घरातच होता. पहिले दोन-तीन दिवस शेजाऱ्यांना काहीच समजलं नाही. मात्र, एका दिवशी अपार्टमेंटमध्ये पोलीस आले तेव्हा धवड दाम्पत्य बेपत्ता असल्याचं शेजाऱ्यांना कळलं.


पोलिसांनी धवड कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत फ्लॅटची तपासणी केली, तेव्हा धवड दाम्पत्याची प्रत्येक वस्तू घरीच आढळली. घर सोडताना भैयासाहेब आणि त्यांच्या पत्नी वनिता यांनी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नेलेलं नाही. दोघांची सर्व ओळखपत्र (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, इतर आयडी), बँकेचे सर्व एटीएम कार्ड्स, पासबुक त्यांनी घरीच ठेवले आहे. रोज लागणाऱ्या अत्यावश्यक औषधं, त्यांचे सर्व प्रिस्क्रिप्शन्सही नेलेलं नाही. धक्कादायक म्हणजे भैयासाहेब यांना सतत चष्मा लावायचे, मात्र तोही घरीच ठेवल्याचं आढळलं. मागील 12 वर्षांपासून शेजारी राहणारे आणि प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांची साथ देणारं दाम्पत्य असं बेपत्ता झाल्याने शेजारी निराश झाले आहेत. एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर घरात सर्वकाही आलबेल नव्हतं, एवढीच माहिती शेजाऱ्यांना आहे

गेल्या 137 दिवसांपासून पोलिसांनी या प्रकरणी बरीच मेहनत घेतली होती , नागपूरचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांनी पिंजून काढलं. इतर राज्यांच्या पोलिसांना भैयासाहेब आणि वनिता धवड यांची माहिती दिली. मात्र, दोघे कुठे गेले, त्यांच्यासोबत नेमके काय झालं, हे कळू शकलं नाही. मात्र, मुलाच्या लग्नानंतर धवड कुटुंबात काही तणाव होता, असं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. या दाम्पत्याबद्दल काहीही कळल्यास नागरिकांनी नागपूर पोलिसांना सांगावं, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

धकाधकीच्या जगात आयुष्य जगताना मध्यम वयातील अनेक दाम्पत्य विविध तणावांना सामोरे जातात. कुटुंबातील ताण तणाव, विविध पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर, नोकरी व्यवसायानिमित्ताने दुरावत जाणारी मुलं, त्यामुळे येणारा एकटेपणा अशा वेगवेगळ्या कारणांनी अनेक वृद्ध दाम्पत्य नैराश्येच्या गर्तेत जातात. मात्र, सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या धवड दाम्पत्याच्या बाबतीत यापैकी नेमकं काय झालं, हे कोणालाच कळलं नाही. अजनी पोलिसांनी सर्व कड़े शोधा शोध घेतली परंतु अद्याप ही धवड दंपती सापडुन आल्या नाही ,

परिसरात सीसीटीव्ही नसल्याने ते कुठल्या दिशेने गेले हे देखील कळायला मार्ग नाही. कुठलाच पुरावा मागे न ठेवता धवड पती-पत्नीचे असे बेपत्ता होने पोलिसांनाही आव्हानात्मक ठरत होते। नागपुर टुडे नी घटनेची गंभीरता बघुन वारंवार धवड दांपत्य लापत्ता म्हणुन बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्याचा मागोवा घेत दोन आठवडया पुर्वी नागपुर जिल्हा वकील संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष कमल सतुजा यांच्या नेतृत्वात वकिलांचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्त डॉ.भुषण कुमार उपाध्याय यांना भेटले , त्यांनी धवड दाम्पत्य चा तपास हा क्राईम ब्रांच ला वर्ग करण्यात यावा असे निवेदन केले होते।

नागपुर टुडे ने नेहमीच घटनेचा मागोवा घेत धवड दांपत्य लापत्ता अश्या बातम्या वारंवार प्रकाशित केल्या। त्याचे गांभीर्य घेत नागपुरचे पोलिस आयुक्त डॉ.भुषण कुमार उपाध्याय यांनी घटनेचे गांभीर घेत धवड दांपत्य चा तपास हा क्राईम ब्रांच ला वर्ग करण्याचा आदेश पारीत केला , याला क्राईम ब्रांच चे पुलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दुजारा देत धवड दांपत्य चा तपास क्राईम ब्रांचला आलेला आहे हे स्पस्ट केले व आम्ही धवड दांम्पत्य लापता घटनेचा लवकरात लवकर वाचा फोडण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी नागपुर टुडेशी चर्चा करतांना आपले मत मांडले।

– रविकांत कांबले
नागपुर टुडे