Published On : Wed, Jun 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात क्राइम ब्रँचची कारवाई; एमडी ड्रग्स, घातक शस्त्रांसह 16 लाखांचे दागिने जप्त

Advertisement


नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स, तलवार-सत्तूरसारखी घातक शस्त्रे तसेच सुमारे 16 लाख रुपयांचे संशयित सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरात गस्तीदरम्यान विश्वास नगर येथील दाऊद पान सेंटरजवळ काही संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपींकडून 16 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. तसेच तलवार आणि सत्तूरसारखी घातक शस्त्रेही आढळून आली. पुढील तपासात पोलिसांनी आरोपींच्या घरांची झडती घेतली असता 88.200 ग्रॅम सोन्याचे आणि 876.800 ग्रॅम चांदीचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत लाखोंमध्ये असून ते चोरीचे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Gold Rate
June 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 50,600 /-
Gold 22 KT ₹ 1,39,800 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आकाश राजू हतागडे (रा. विश्वास नगर, गिट्टीखदान), योगेश संजू सिरिया (रा. गवलीपुरा, सदर) आणि आकाश गजानन टाले (रा. मानव सेवा नगर) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपींवर यापूर्वी विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासादरम्यान ड्रग्स पुरवठा साखळीतील आणखी एक संशयित आरोपी आकाश कटारिया उर्फ ‘अक्कू’ याचे नाव समोर आले आहे. तो सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग्स आरोपी आकाश हतागडे याने योगेश सिरिया याच्याकडून घेतल्याचे, तर योगेशने ते फरार आरोपी अक्कूकडून मिळवल्याचे उघड झाले आहे. या माहितीच्या आधारे पोलिस आता संपूर्ण अमली पदार्थ पुरवठा साखळीचा तपास करत आहेत.

या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी एनडीपीएस कायदा, शस्त्रास्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. नागपूर पोलिसांनी ड्रग्स, अवैध शस्त्रे आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement
क्राइम ब्रांच की कार्रवाई से तस्करों में हड़कंप.. #nagpurnews #crime #latestnews #accusedarrest

क्राइम ब्रांच की कार्रवाई से तस्करों में हड़कंप.. #nagpurnews #crime #latestnews #accusedarrest

वाशी पुलिस की दंगा नियंत्रण ड्रिल ...#news #newsupdate #maharashtranews #maharashtra

वाशी पुलिस की दंगा नियंत्रण ड्रिल ...#news #newsupdate #maharashtranews #maharashtra

नांदेड़ में निकली भव्य महाराणा प्रताप यात्रा ...#news #newsupdate #maharashtranews #maharashtra

नांदेड़ में निकली भव्य महाराणा प्रताप यात्रा ...#news #newsupdate #maharashtranews #maharashtra

992 ग्राम गांजा, कोयता और चोरी का माल बरामद.. #nagpurnews #crime #drugs #latestnews

992 ग्राम गांजा, कोयता और चोरी का माल बरामद.. #nagpurnews #crime #drugs...

नागपुर के हुडकेश्वर में घर के किचन से निकला विषैला मण्यार सांप #nagpurnews #saap #rescue #newsupdate

नागपुर के हुडकेश्वर में घर के किचन से निकला विषैला मण्यार सांप...

उद्धव साहेब डरो मत, चिंता मत करो; भास्कर जाधव का बड़ा राजनीतिक बयान #maharashtranews #politicsnews

उद्धव साहेब डरो मत, चिंता मत करो; भास्कर जाधव का बड़ा राजनीतिक...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges