Published On : Thu, May 27th, 2021

कोरोनापासून दूर राहण्यासाठी ‘सोशल बबल’ तयार करा !

Advertisement

मनपा-आयएमए आयोजित कोव्हिड संवाद कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नागपूर: कोरोनापासून खेळाडूंनी दूर राहावे यासाठी आयपीएलमध्ये ज्या प्रकारे ‘बायोबबल’ तयार करण्यात आला होता, त्याचप्रमाणे आता प्रत्येकाने ‘सोशल बबल’ तयार करायला हवा. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग हे यातील महत्त्वाचे दुवे असून याची आता सवय करायला हवी. मनातून संपूर्ण भीती घालवायला हवी, असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरुवारी (ता. २७) मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निखिल पांडे, डॉ. सागर चिद्दरवार सहभागी झाले होते. याप्रसंगी ते कोव्हिडपश्चात मानसिक समस्या आणि निराकरण’ या विषयावर बोलत होते.

कोरोनामुळे आणि कोरोनानंतरही नागरिकांच्या मनात भीती असते. या भीतीचे व्यवस्थापन जर योग्य प्रकारे करता आले नाही तर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. या काळात अनेकांना झोप येत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरानाकाळात घरी राहिल्याने ‘स्क्रीन ॲडिक्शन’सुद्धा वाढले आहे. झोप न येण्याचे हे एक कारण असू शकते. तणाव हे सुद्धा एक कारण ठरू शकते. या काळात आपण चांगला व्यायाम केल्यास तणावापासून दूर जाण्यास मदत होते. तणावाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता यायला हवे, असेही डॉक्टरद्वय म्हणाले. कोरोनामुळे पॅनिक अटॅक येऊ नये, यासाठी काय करावे, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, या अटॅकमुळे जीव जात नाही. बऱ्याचदा हा अटॅक आल्यानंतर जर एवढे आपल्याला समजले तर त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. ज्याला हे समजले त्याच्या मनातून काही अटॅक नंतर ही भीतीसुद्धा मनातून निघून जाते, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून घरात बसलेल्या मुलांना आता हळूहळू सायकल चालवणे असशा काही ॲक्टिव्हिटी सुरू करायला हव्या. कदाचित यावर्षी शाळेत जाता येईल. पण त्याआधी बाहेर वावरताना मास्क, सॅनिटाईजर आणि सोशल डिस्टंन्सिंग ह्या सवयी त्यांनी लावून घ्यायला हव्या. ज्येष्ठांनीही बाहेर पडताना या गोष्टींचे पालन करायला हवे. कुणाच्या मनात बिलकुल भीती नसते तर कुणाच्या मनात खूपच भीती असते. बिलकुल भीती नसणे आणि अति भीती असणे ह्या दोन्ही गोष्टी घातक आहे. थोडी तरी भीती मनात असली तर आपण सतर्क होतो. आता जिवंत राहणे, हेच सध्या आपले उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement