Advertisement
gavel
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी छत्रपती नगर येथिल सून घरात एकटी असल्याची संधी साधून नराधम सासऱ्याने सुनेचा बळजबरीने हात पकडून तिला बेडवर नेले व ओरडू नको चुप रहा अशी जबरदस्ती करून लैंगिक कृत्य केल्याची घटना 3 मार्च 2017 ला दुपारी 3 वाजता घडली असता यातील पीडित सुनेने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी 55 वर्षीय सासरा विरुद्ध भादवी कलम 354 अनव्ये गुन्हा नोंदविला होता या गुन्ह्यातील प्रकरणाची आज कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात झालेल्या न्यायालयीन सुनावणीत न्यायाधीश व्ही एम गायकवाड यांनी आरोपी ला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 3 हजार रुपये दंड ठोठावला. शिक्षा झालेल्या आरोपी सासऱ्याचे नाव सिद्धार्थ कन्हान देशभ्रतार रा.छत्रपती नगर कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
न्यायाधीश व्ही एम गायकवाड यानि आरोपिला सुनावल्या महिला सरकारी वकील म्हणून ज्योती लकडे तर तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली मेश्राम, पेरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी अशोक आत्राम, प्रकाश मुसळे यांनी मोलाची भूमिका साकारली.
संदीप कांबळे कामठी
Advertisement