Published On : Sat, Mar 7th, 2020

प्रबुद्ध नगर च्या 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रबुद्ध नगर राहिवासी एका 16 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध गाठून लग्नाचे आमिष देत मुलीच्या घरी जाऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या संदर्भात पीडित मुलीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारींवरून 17 वर्षीय आरोपी विरुद्ध भादवी कलम बलात्काराच्या गुन्ह्यासह अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा विधिसंघरशित मुलगा असून नागपूर येथील यशोधरा नगर चा रहिवासी आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित अल्पवयीन मुलीच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आई वडिलांना आर्थिक आधार देण्याहेतु मागील तीन वर्षांपासून शाळा सोडून किराणा ओली कामठी येथील चायना सेल दुकानात काम करीत होती तर आरोपी 17 वर्षीय मूलगा हा जय किचन वेअर कामठी ह्या भांड्याच्या दुकानात काम करत होता दरम्यान ता दोघांचे मैत्री होऊन मैत्री प्रेमप्रकरणातून बदलले त्यावेळी आरोपी मुलाने लग्नाचे आमिष दिल्यावरुन मिळेल त्या वेळी मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून शारीरिक संबंध गाठायचे मात्र कित्येक महिने झाल्या नंतर मासिक पाळी न आल्याने केलेल्या आरोग्य तपासणीतून मुलीला दिवस गेल्याचे कळताच न्यायिक हक्कासाठी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी