Published On : Fri, Oct 2nd, 2020

देशपातळीवर स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालयात भंडा-याचा गौरव

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते कन्हाळगावला देशातून दुस-या क्रमांकाचे पुरस्कार

प्रशस्तीपत्र आणि मानचिन्हाने स्वच्छतेच्या कार्याचा सन्मान

व्हर्चुअल कार्यक्रमातून जल शक्ती मंत्रालयाने साधला संवाद

Advertisement

Advertisement

भंडारा : स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय (SSSS) स्पर्धेत देशपातळीवर दुस-या क्रमांकाची मानकरी ठरलेली लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव ग्राम पंचायतीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज 2 ऑक्टोबर 2020 ला व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कठारीया यांनी प्रशस्ती पत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. या प्रसंगी खासदार सुनील मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., कन्हाळगावचे ग्राम सेवक उध्दव मैंद, ग्राम पंचायत प्रशासक वसंत सरोदे आणि विस्तार अधिकारी लंजे आदींनी पुरस्कार स्विकारला. राष्ट्रीय पुरस्काराने भंडारा जिल्ह्याचा स्वच्छतेच्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या व्हर्चुअल पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनिषा कुरसंगे, विस्तार अधिकारी लंजे, ग्राम पंचायत प्रशासक वसंत सरोदे, ग्रामसेवक उध्दव मैंद, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, अंकुश गभने, राजेश्वर येरणे, बबन येरणे, गजानन भेदे, हेमंत भांडारकर, आदित्य तायडे आदींची उपस्थिती होती.

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय अभियानांतर्गत स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांचे नेतृत्वात कन्हाळगावचे माजी सरपंच सौ. सुमन रामटेके आणि स्थानिक पदाधिका-या सहकार्याने कन्हाळगाव येथे सामुदायीक शौचालयाचे निर्माण करून त्यावर शिक्षित करणारे स्वच्छता बाबतचे संदेश वॉलपेटींगद्वारे रेखाटण्यात आले.

1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत घेतलेल्या स्पर्धेत ग्राम पंचायतस्तरावर लाखांदूर तालुक्यातील ग्राम पंचायत कन्हाळगावचे राष्ट्रीयस्तरावर नामांकन दाखल करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने घोषीत केलेल्या स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय स्पर्धेत देशात दुस-या क्रमांकाने भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून ग्राम पंचायत कन्हाळगावची निवड करण्यात आली.

आज 2 ऑक्टोबर 2020 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत दिनी देशभरातील विविध पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्राम पंचायतींचा गौरव करण्यात आला. भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या व्हर्चुअल पुरस्कार वितरण कार्यक्रमात जल शक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, रतनलाल कटारिया, जल शक्ती मंत्रालयाचे सचिव यु. पि. सिंग, अप्प्र सचिव अरूण बारोका यांचे उपस्थितीत कन्हाळगाव ग्राम पंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह असे स्वरूप असलेला देशपातळीवर दुस-या क्रमांकाचा पुरस्कार ग्राम पंचायत प्रशासक, ग्रामसेवक यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुनील मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, यांचे हस्ते ग्राम पंचायत कन्हाळगावचा प्रशासक वसंत सरोदे, ग्रामसेवक उध्दव मैंद यांचा सन्मान करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीयस्तरावर स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय अभियानात भंडारा जिल्हयातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत कन्हाळगाव गौरव करण्यात आल्याने ग्राम पंचायतीच माजी सरपंच, पदाधिकारी, गट विकास अधिकारी अगरते तसेच पाणी व् स्वच्छता कक्षाचे त्रिरत्ना उके, चेतन मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement