Published On : Thu, Feb 11th, 2021

मनपा देणार रासेयोच्या मुलांना ‘फायर फायटिंग’चे प्रशिक्षण : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) च्या सहकार्याने नागपूरातील विविध महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांना “फायर फायटिंग”चे निशुल्क प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक महाविद्यालयाचे किमान ७ विद्यार्थ्यांना अश्या प्रकारचे प्रशिक्षण दिल्यास प्रत्येक वर्षी दोन ते तीन हजार प्रशिक्षीत मुले तयार होतील. जे आपदाचा वेळेत नागरिकांची, शहराची संपदा वाचविण्यात मदत करतील, ही घोषणा महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी (ता.११) ला बैठकीत केली.

महपौर कक्षात झालेल्या बैठकीत महापौर श्री. तिवारी आणि राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. सोपानदेव पीसे यांच्यासह उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त (उद्यान) अमोल चौरपगार, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, अग्निशमन विभागाचे उप मुख्य अधिकारी बी. पी. चंदनखेडे, स्थानाधिकारी (सिव्हील) आदी उपस्थित होते.

हे प्रशिक्षण निरंतर असेच सुरू राहील यामुळे येणाऱ्या काळात शहराच्या विविध भागात काही काळात ८ – १० हजार फायर फायटिंग प्रशिक्षित मुल तयार होतील, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले की, शहरात एखाद्या परिसरात अचानक आग लागली तर ही प्रशिक्षित मुले अग्निशमन दलाला मदत करतील. तसेच अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी उशीर झाल्यास प्रशिक्षित विद्यार्थी आग पसरू नये साठी प्राथमिक स्तरावर काही उपाययोजना सुध्दा करू शकतील.

शहरातील पुतळे संवर्धनासाठी रासेयोचा पुढाकार
शहरात असलेल्या पुतळ्यांमुळे शहराचे सौंदर्य अधिकच वाढले आहे, त्यामुळे पुतळ्यांचे संवंर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शहरातील पुतळे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपातर्फे रासेयोला लागणारी संपूर्ण मदत करण्याची हमी दिली.

राष्ट्रीय सेवा योजना असलेल्या विविध कॉलेजच्या टीम शहरातील झोननिहाय पुतळे दत्तक घेउन आठवड्यातून एक दिवस पुतळ्याची स्वच्छता करतील. राष्ट्रीय सेवा योजनेच्या टीमला स्वच्छतेसाठी मनपाचे सफाई कार्मचारी सतेच पुतळे धुण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग सहकार्य करेल, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. सध्या नागपूर शहरात 68 पुतळे आणि 14 स्मारक आहेत असे एकूण 82 पुतळे आहेत. ज्या परिसरात संबंधित कॉलेज असेल त्या परिसरातील पुतळ्याची जबाबदारी संबंधित कॉलेज घेईल, यासाठी मनपाद्वारे प्रत्येक टीम मधील सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

रासेयोच्या कॉलेजची यादी मिळताच झोननिहाय बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले.