Published On : Thu, Feb 11th, 2021

खेळातून प्रशिक्षण देणा-या लॅबची महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह आमदार प्रवीण दटकेंनी केली पाहणी

पाथ फाइंडर यांनी साकारली अत्याधुनिक माय सायंस लॅब

नागपूर : विद्यार्थ्यांनी खेळ खेळतानाच विज्ञानातील गंमती जमती समजून घ्याव्यात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दटलेल्या विज्ञानाची त्यांना उकल व्हावी, या हेतून शहरातील नंदनवन येथील महिला महाविद्यालयाच्या परिसरात पॉथ फाइंडर संस्थानी माय सायंस लॅब अत्याधुनिक विज्ञान लॅब साकारण्यात आली आहे. या लॅबची बुधवारी (ता.१०) महापौर दयाशंकर तिवारी व आमदार प्रवीण दटके यांनी पाहणी केली.

या लॅबमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळातून विज्ञानाचे प्रात्यक्षिक शिकविले जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील कुतुहल, उत्सुकता, जिज्ञासा या सर्वांना वैज्ञानिक जोड देउन त्यांच्या मनातील सर्व शंकांचे प्रत्यक्ष अनुभुतीद्वारे निरसरन या वैज्ञानिक लॅबमधून केले जाते.

या लॅबचे महापौर दयाशंकर तिवारी व आमदार प्रवीण दटके कौतुक केले. विज्ञानाप्रमाणेच भूगोलाविषयी सुद्धा अशी लॅब तयार करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.

या विज्ञान लॅबच्या धर्तीवर नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्येही अशा अत्याधुनिक लॅब तयार व्हाव्यात यासाठी प्रयत्नरत असल्याचे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले. आपल्या आमदार निधीद्वारे मनपाच्या शाळांमध्ये अशा अत्याधुनिक लॅब तयार करण्यात येतील, यासाठी ५० लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माय सायंस लॅब चे संस्थापक संचालक धनंजय बालपांडे यांनी माहिती दिली की तीन वर्षापूर्वी माय सायंस लॅब ची सुरुवात करण्यात आली. खेळांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांनी विज्ञानाची माहिती देण्यासाठी लॅब फार उपयोगी ठरत आहेत. त्यांच्या संस्थाचे माध्यमाने शाळांना- शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाते. आतापर्यंत संस्थांनी दिल्ली, नोयडा, गुरुग्राम, भंडारा, यवतमाळ अश्या अनेक ठिकाणी लॅबची स्थापना शाळांमध्ये केली.

आमदारांच्या बुलेटवरून महापौरांची सैर
महापौर दयाशंकर तिवारी व आमदार प्रवीण दटके थेट बुलेटची सैर करून नंदनवन येथील महिला महाविद्यालय गाठले. कुठलाही शिष्ठाचार न ठेवता अगदी साधेपणाने आमदारांनी बुलेट चालवित महापौरांसह लॅबमध्ये आले. शहराच्या विद्यमान व माजी आमदारांच्या साधेपणाची झलक यावेळी नागपुरकरांना अनुभवता आली, हे विशेष.