Published On : Thu, Feb 11th, 2021

लसीकरण केन्द्रांना कुकरेजांनी दिली भेट

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा यांनी गुरुवारी (ता.११ फेब्रुवारी) शहरातील तीन प्रमुख कोरोना लसीकरण केन्द्र पाचपावली सुतिकागृह, इंदिरा गांधी रुग्णालय आणि एलेक्सीस रुग्णालयाला भेट दिली. या केन्द्रामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांना कोरोनाची लस दिली जात आहे.

या केन्द्रामध्ये कोरोना लसीकरणासाठी शासनाच्या दिशा निर्देशाचे पालन कश्या प्रकारे केले जात आहे याबददलची माहिती श्री. कुकरेजा यांनी घेतली. त्यांनी मनपाच्या केन्द्रात कोरोना लसीकरणाची कमी संख्येबददल विचारणा केली आणि लाभार्थ्यांची संख्या कशी वाढविता येईल याबददल सूचना केली. तसेच त्यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. लसीकरणासाठी ज्यांचे नांव यादीत आहेत आणि ज्यांना सूचना प्राप्त झाली आहे त्यांनी संबंधीत लसीकरण केन्द्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन ही केले.

यावेळी सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.‍विजय जोशी, झोनल वैकीय अधिकारी डॉ.दीपांकर ‍ भिवगडे, डॉ. अतिक खान, डॉ. कांचन किम्मतकर आदी उपस्थित होते.