नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शुक्रवारी जिल्ह्यात २३० जण कोरोनाबाधित आढळले असून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. इतकेच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले आहे.
याठिकाणी १५० हून अधिक नागरिकांना कोरोना झाल्याची माहिती आहे. शहरात ७३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. तर ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरात कोरोना रुग्णांचा वाढत चाललेला आकडा पाहता नागरिकांनी आता खबदारी बाळगणे गरजेचे आहे.
जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
दरम्यान कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना बाधितांमुळे सक्रीय रुग्णसंख्याही ७७७ पर्यंत गेली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३६४ तर शहरातील ३९० जणांचा समावेश आहे. २३ जण जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती आहे.