Published On : Sun, Apr 19th, 2020

सतरंजीपुरा झालेय कोरोनाचे हॉटस्पॉट, मिल्ट्रीशिवाय पर्याय नाही : आमदार कृष्णा खोपडे यांचे मागणीला पुन्हा दुजोरा

सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज अन्यथा परिणाम भयंकर

नागपूर : सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉजिटीव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्मेपेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहे. प्रशासनाला वारंवार सांगून देखील यावर नियंत्रण होऊ शकले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा पत्र देऊन तत्काळ मिल्ट्री लावण्याची मागणी केली मात्र कसल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आज सतरंजीपुरा परिसर दहशतीचे केंद्र होऊन ठेपला आहे. त्यामुळे हा परिसर आता विनाविलंब मिल्ट्रीकडे सोपवा अन्यथा येत्या काळात याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा आमदार कृष्णा खोपडे राज्य सरकार व प्रशासनाला दिलेला आहे.


आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीविरोधी पक्ष नेते मा.देवेंद्रजी फडणवीस, जिल्हाधिकारी व म.न.पा. आयुक्त यांना दिलेल्या पत्रात कि, सतरंजीपुरा येथील मुस्लीम बहुल परिसरात पुन्हा कोरोनाचे आठ पॉजिटीव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्मेपेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहे.

तसेच अनेक संशयित रुग्णाचे सतरंजीपुरा कनेक्शन दिसून येत आहे. प्रशासनाला वारंवार सांगून देखील यावर नियंत्रण होऊ शकले नाही. हा परिसर पोलीस विभागाने सील केलेला असून देखील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे हा परिसर मिल्ट्रीच्या स्वाधीन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वेळीच नियंत्रण केले नाही तर भविष्यात स्थिती नियंत्रणाबाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.