Published On : Fri, Jul 17th, 2020

कोरोना से नहीं कोरोणटाईन से डर लगता है साहब – प्रधान

Advertisement

कोराडी येथील देवी मंदिर भक्त निवास कोरोन्टाईन केंद्र म्हणून उपयोगात आणा-काशीनाथ प्रधान

कामठी : -सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरला असून तालुक्यातील शहरात जणू काही कोरोना चा कहर च पसरला आहे परिणामी तालुक्यात कोरिणाबधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस गाठत आहे तर कोरोनाबधित रुग्ण आढळल्या नंतर प्रशासनाच्या वतीने त्या पोजिटिव्ह रुग्णाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या घरमंडळी तसेच संबंधितांना वारेगाव च्या शासकीय वसतिगृहात कोरोन्टाईन करण्यात येते सध्यस्थीतीत ते कोरोन्टाईन केंद्र हे हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आगामी बिकट परिस्थिती गंभोर्याने लक्षात घेत कोराडी येथील क श्रेणी तीर्थक्षेत्र असलेले देवी मंदिर भक्त निवास हे कुणाची खाजगी मालमत्ता नसून शास्कोय मालमत्ता आहे व कामठी तालुक्यात आहे तेव्हा सर्व सुविधायुक्त असलेले हे भक्त निवास कोरोन्टाईन सेंटर म्हनून उपयोगात आणण्यात यावे तर या महामारीच्या कोरोना लढाईत व अशा बिकट परिस्थितीत हे भक्त निवास देण्यास अडथळा करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर शासकीय कामात अडथळा करण्याच्या प्रकार अंतर्गत कायदेशीर कारवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.

12 एप्रिल 2020 ला कामठी शहरात पहिला कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळला होता तर सात जुलै ला कामठी शहर हे कोरोना मुक्त ठरले होते मात्र दुसऱ्याच दिवशी कामठी येथील कोळसाटाल परिसर रहिवासी व बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीत काम करणारा एक कर्मचारी पोजिटिव्ह आढळल्या नंतर त्याच्या संपर्कातील आलेल्या बहुधा नागरिक सुदधा कोरोना बाधित आढळले तसेच हरदास नगर येथील रहिवासी व खैरी येथील एका मूर्ती कंपनीत काम करणारी एक महिला पोजिटिव्ह आढळली व त्यानंतर तिच्या संपर्कात आलेले सुदधा कोरोना पोजोटिव्ह आढळले यानुसार कोरोणाचा जणू काही उद्रेकच झाला ज्यामध्ये काही चिमुरडे बालके सुदधा आढळले आहेत तर कुठे चिमुकली बाळ पोजिटिव्ह तर आई निगेटिव्ह आल्याचा प्रकार सुदधा आढळलेला आहे

वास्तविकता ही वाढत असलेली कोरोना बाधित साखळी तोडण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजना तुन सोशल डिस्शिंनशिंग तसेच मास्क वापरणे अनिवार्य केले असले तरी कोरोना रुग्ण तपासणी अहवालात पोजिटिव्ह अहवाल येताच त्या रुग्णाच्या घरी पोलिसांची गाडी , तहसिल प्रशासनाच्या ताफ्यासह आरोग्य विभागाचे पथक व अंबुलेन्स येते दरम्यान वस्तीतील नागरिक जणू प्रदर्शनी लागली की काय असे वर्तन करीत मोबाईल च्या चित्रफितीत अपलोड करतात तर त्या कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्याच्या प्रत्यक्षात आलेल्याना विलीगी करण कक्षात हलविले जाते तर ‘कोरोना बाधित रुग्णाला नागपूर ला पाठविले जाते या दरम्यान 14 दिवसाचा कालावधी हा घरापासून दूर काढावे लागते ज्यामध्ये कित्येक जण हे मानसिक तणावात असतात परिणामी कोरोना झाला म्हटलं की बेईजतीच्या दारात उभे झाल्याचे जाणवते त्यातच कोरोनटाईन पद्धत ही संशयितांसाठी डोकेदुखी च ठरत असल्याने कित्येक नागरिक हे कोरोना च्या भीतीने नाही तर कोरोन्टाईन च्या भीतीने स्वतःची टेस्ट करायला घाबरत आहेत त्यामुळे कोरोना से नहीं तो कोरोनटाईन से डर लगता है साहब!

अशी चर्चा सर्वसामान्य नागरीकात दिसून येत आहे तेव्हा तालुका प्रशासनाने या कोरोना व कोरोनटाईन या एकाच सिकक्याच्या दोन बाजू असलेल्या परिस्थितीची जाणीव करून घेत कोरोणाबधित रुग्णासह संशयितासाठी त्यांच्या स्वगृही वा स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा पूरवतील तसेच सर्व सुविधायुक्त असलेले कोराडी देवी मंदिर भक्त निवास ला उपयोगात आणून कोरोन्टाईन सेंटर म्हणून वापर करावा अशी मागणी काशीनाथ प्रधान यानो केले आहे