वाडी : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत गुरुवारी दुपारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.वाडी, दौलामेटी,डिफेंस येथील शाळांचा कला,वाणिज्य,विज्ञान विद्यान शाखेचा निकाल सरासरी 80 टक्क्यांहून अधिक लागला.बहुतेक ठिकाणी मुलीच पुढे असल्याचे चित्र दिसले.
ग.भा.शकुंतला देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय,आदर्श वाडीच्या १२ वीच्या परीक्षेचा आनंददायक निकाल लागला असून एकूण परीक्षेचा निकाल 85 टक्के घोषित झाला असून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कला विभाग-71.42,वाणिज्य विभाग -91.52 व विज्ञान विभाग 92.15,कला विभागातून चैताली बाबाराव गभणे प्रथम, वाणिज्य शाखा मध्ये आम्रपाली प्रकाश लोखंडे आणि विज्ञान शाखेत सिमरन नानाजी मेश्राम यांनी प्रथम क्रमांक मिळविला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक प्रियंका देशमुख,विश्वासराव देशमुख, प्राचार्या नंदिनी पोजगे, अतुल देशमुख इ.नी अभिनंदन केले.
श्री.विश्वनाथ बाबा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वाडी यांचे परीक्षेचा निकाल उत्कृष्ट घोषित झाला.आध्यापक व विद्यार्थ्यांत आनंद दिसून आला. कला विभाग.88.87,विज्ञान विभाग 100% निकाल लागला.कला विभागातून मुस्कान नवाब67.53, जैसू ईश्वर क्षीरसागर 84.92, विज्ञान विभागात स्वाती दुर्योधन चंदनबावणे 81.23 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर राहिले.
यशस्वी विद्यार्थ्यांची संस्था प्रमुख श्यामकुमार जयस्वाल, सचिव राजेश जयस्वाल, प्राचार्य अनिता टोहरे व शिक्षकांनी अभिनंदन केले.
जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडी चे सुयश वाडी स्थित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट
निकालाची परंपरा कायम ठेवत एच.एस.सी. बोर्ड परीक्षा 2020 च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.महाविद्यालयाचा एकूण निकाल 94.90% लागला.विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेमध्ये वाडी प्रभागातून प्रथम येण्याचा मान महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.
विज्ञान शाखेतुन श्रावणी दिनेश इंगळे 85.69%,
आशिष परमेश्वर तागडे 83.68% ,रोशन पितांबर शाहू 81.08 तर वाणिज्य विभाग प्रिया नरेश चौधरी 66.31,प्रियंका नरेश जांभुळकर 65.38,काजल रामप्रसाद चौधरी 65.15कला विभाग श्वेता रमेश लोंढे 66.31,आयुश रामदास रंगारी 66,श्रध्दा विजय बुटे 65.5 आशिष परमेश्वर तागडे या विद्यार्थ्याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त
करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या समस्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रणजितबाबू देशमुख, सचिव युवराजजी चालखोर व क, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेंद्र प्र. सोहळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यानी अभिनंदन केले.
आयुध निर्मणी येथे असलेल्या धरमपेठ हायस्कूलच्या १२ वीच्या निकाल उत्कृष्ट लागला. एकूण निकाल 100 टक्के घोषित झाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाणिज्य विभाग 100 टक्के,विज्ञान विभाग 100 निकाल प्रशंसनीय राहिला.वाणिज्य शाखेत सायली अंडरसहारे 80.46,नितुकुमारी शर्मा 79.69, सेजल मेश्राम 75.69 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर राहिले.विज्ञान शाखेत रश्मी मिश्रा 65.23,नयन बंन्सोड60.30, उत्कर्ष ढोरे 60.15 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाले.संस्थाचालक उल्हास औरंगाबादकर, रत्नाकर केकतपुरे, दीपक दुधाणे, प्राचार्य विजय मुनघाटे व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दौलमेटीतील आदर्श कला वाणिज्य महाविद्यालयाचा परीक्षेचा निकाल 80 टक्के जाहीर करण्यात आला असून त्यात कला विभाग 74.54 टक्के, वाणिज्य विभाग 88.57 टक्के,तर एमसीव्हीसीचा निकाल 92 टक्के लागला. वाणिज्य शाखेत प्रणाली ठाकरे 88.33, अंजुम पठाण 77.83, कोमल शर्मा 76.66 टक्के, कला विभागात हृतिक गोघाटेने 77.16 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
संस्थेचे प्रमुख राजश्री मुंडाफळे, प्राचार्य सुरेंद्र मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.