Published On : Sat, Jun 26th, 2021

ग्रीन क्रॉस लायब्रेरी च्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार

कामठी :-कोरोनाची दुसरी लाट नुकतीच नियंत्रणात आली असून ही लाट नियंत्रणात आणण्यात प्रशासनातील आरोग्य अधिकारो कर्मचारो, पोलिस अधिकारी कर्मचारी यासह नगर परिषद प्रशासन सह तहसील प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका साकारली आहे .

या प्रशासनिक अधिकारी कर्मचाऱ्या मुळेच आजची कोरोना स्थिती नियंत्रणात असून आज च्या स्थितीत 200 च्या वर कोरोना तपासणी होत असल्या तरी कोरोना पोजिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ही शून्यावर आली आहे त्यामुळे प्रशासनाचे नागरिकांच्या वतीने आभार मानत प्रशासनाचे कौतुक करण्याहेतू ग्रीन क्रॉस सोसायटी कामठी व ग्रीन क्रॉस लायब्रेरी च्या विद्यार्थिनी च्या वतीने आज सकाळी 10 वाजता नविन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, पी आय काळे व इतर पोलीस वर्ग कर्मचारी यांचा सत्कार करून मिष्ठांन व थंड पेय देऊन प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारो डॉ शबनम खानुनो यासह समस्त आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आरोग्य सेविका तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालय च्या आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रीन क्रॉस सोसायटी चे करार हैदर यांनी मानले.