Published On : Sat, Jun 26th, 2021

शनिवारी आठवडी बाजार येथे फुटपाथ बाजार चालू ठेवा – आप ची मागणी

नागपुर – शनिवारी आठवडी बाजार येथे चारचाकी गाड्यांना प्रतिबंध घालून फुटपाथ व्यापाऱ्यांना राहत देण्यासाठी आम आदमी पार्टी मध्य नागपूर तर्फे वाहतूक पोलीस निरीक्षक संत्रा मार्केट नागपूर यांना संघठन मंत्री प्रभात अग्रवाल यांच्या नेतृत्वात निवेदन सादर.

नागपूरचा शनिवारी आठवडी बाजार संत्रा मार्केट जवळ अंग्रेज काळापासून शुरू आहे. येथे जुने नवीन वस्तू स्वस्त दरात मिळते म्हणून पूर्ण विदर्भातून लोक खरेदीसाठी दर शनिवारी या बाजारात येतात. पण एक दोन वर्षांपासून या रोडवर खूपच गर्दी होत असल्याने यातायात बाधित होत आहे, याकरिता पोलीस गरीब फुटपाथ व्यापाऱ्यांना माल जब्तीची आणि दुकान बंद करण्याची धमकी देतात.

कोरोना महामारी मुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. आठवड्यात एक दिवस त्यांना रोजगार मिळावा याकरिता शनिवारच्या दिवशी चारचाकी गाड्यांना प्रतिबंध लागले तर वाहतुकीची गर्दी होणार नाही आणि बाजार व्यवस्थितपणे शुरू राहतील.

यावेळी हरीश वेळेकर, गिरिश तितरमारे, नागपूर युवा आघाडी अध्यक्ष, तारा कचूरे, इरफान शेख, याकूब खान प्रामुख्याने उपस्थित होते.