Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Apr 26th, 2020

  नागपुरात पुन्हा 17 रुग्ण आढळले : रुग्णांची संख्या 126

  नागपूर : नागपुरात शनिवारी पुन्हा १९ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या १२४ झाली आहे. नागपुरात रुग्ण वाढत असलेतरी नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाण मोठे आहे.

  २५ एप्रिलपर्यंत विदर्भातून आलेल्या एकूण २०४३ नमुन्यांमधून तब्बल १८३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारी ही बाब आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू निदान प्रयोगशाळेत आज पहिल्या फेरीत ३० नमुने तपासण्यात आले. यात सतरंजीपुरा येथील २४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. पाच दिवसापूर्वी या रुग्णाला संशयित म्हणून वनामती येथे दाखल करण्यात आले होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेने ५५ नमुने तपासले.

  नव्याने वाढ झालेल्या १९ रुग्णांमध्ये तब्बल १७ रुग्ण हे वानाडोंगरी क्वारंटाईन केंद्रातील आहेत. या रुग्णांमुळे आता ने नागपुरात रुग्णांची संख्या १२४ वर पोहचली आहे. यातील २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  २०४३ नमुन्यांची तपासणी कोरोनाच्या प्रादुर्भावाला आत दीड महिन्यावर कालावधी होत आहे. परंतु विदर्भात नागपूरसह अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशिम व गोंदिया या सातच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. या जिल्ह्यामधून आलेल्या नमुन्यांची तपसणी नागपुरातील मेयो, मेडिकल, एम्स, नीरी व माफसू विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत होत आहे. आतापर्यंत येथे एकूण २०४३ नमुन्यांची तपासणी करण्यात असून २०७ पॉझिटिव्ह रुग्ण वगळात १८३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

  ८१ संशयित घरी संस्थात्मक अलगीकरणात सर्वाधिक रुग्ण सतरंजीपुरा, मोमीनपुरा, टिमकी, भालदारपुरा, शांतिनगर याच भागातील आहेत. सध्या ६५५ संशयित या अलगीकरणात दाखल आहे. यातील ८१ संशयितांचे नमुने १४ दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. पुढील १४ दिवस ते होम क्वारंटाईन राहतील.

  कोरोनाविषयक माहितीसाठी ‘एम्स’चा हेल्पलाईन नंबर कोरोनाविषयक माहिती, प्राथमिक स्तरावर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला, तणावाचे व्यवस्थापन आणि आजाराच्या मार्गदर्शनासाठी ‘एम्स’ने हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे. ‘९४०४०४४९४४’ हा क्रमांक २४बाय ७ लोकांच्या सेवेत असणार आहे.

  कोरोनाची आजची स्थिती दैनिक संशयित ८८ दैनिक तपासणी नमुने २०० दैनिक निगेटिव्ह नमुने १७९ नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२४ नागपुरातील मृत्यू ०१ डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २२ डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १२६७ कारंटाईन कक्षात एकूण संशयित ६५५ पीडित-१२४-दुरुस्त-२२-मृत्यू-१


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145