Published On : Mon, Mar 15th, 2021

कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित- सुनिल केदार

Advertisement

– शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घेतले लसीकरण


नागपुर सध्या संपूर्ण जगात कोरोना या महामारीचे संकट उभे राहले आहे. संपूर्ण जग या महामारीच्या छायेखाली आलेले आहे. या संपूर्ण परिस्थिती मुळे जग जवळपास थांबलेल्या अवस्थेत होते. पण या रोगराई वर मात करणेकरिता शास्त्रज्ञांनी लस विकसित केली.

व शासनाने सुद्धा टप्प्या टप्प्यात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. सुनील केदार यांनी आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले.

यावेळी मंत्री सुनील केदार यांनी समस्त जनतेला लसीकरण करण्याचे आव्हाहन केले. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही. समाजमध्यांवरील अफवाना बळी न पडता समस्त जनतेनी हे कोरोना प्रतिबंधात्मक लसिकारण करून घ्यावे. जेणेकरून आपण आपले व आपल्या कुटुंबाचे कोरोना महामारीने रक्षण करू शकू.