Published On : Thu, Oct 8th, 2020

कोरोनाशी लढण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्वपूर्ण – राऊत

– ज्ञानदीप संस्थेतर्फे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर कॉन्ट्रॅक्टर व बिल्डर असोसिएशनतर्फे ॲम्बुलन्स

नागपूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासनासोबत सेवाभावी संस्थांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे. ज्ञानदीप या संस्थेतर्फे देण्यात आलेली ऑक्सिजन मशीन तसेच व्हेंटिलेटर आदी साहित्य कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे मृत्यू व रुग्णवाढीचा दर नियंत्रणात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ज्ञानदीप संस्थेतर्फे आठ ऑक्सिजन यंत्र तसेच व्हेंटिलेटर कन्व्हर्टर यंत्र, कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनतर्फे कोविड रुग्णांसाठभ्‍ नि:शुल्क दोन रुग्णवाहिका आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगश कुंभेजकर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जी. ओ. शेख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन, ज्ञानदीप संस्थेचे प्रभाकर वर्धने, बीसीके नायर, मोरेश्वर ढोबळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सावजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेले पॅन ऑक्सिजन मशीन व इलेक्ट्रॉनिक व्हेंटिलेटर कन्व्हर्टर ज्ञानदीप संस्थेतर्फे ग्रामीण, अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्था तसेच महानगरपालिका व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांचे आरोग्य केंद्र, मेळघाटातील महान या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या संस्थेत त्यासोबतच स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, मातृसेवा संघ, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर महानगरपालिका, दंदे फाऊंडेशन या संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.

कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनतर्फे कोविड रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी दोन्ही रुग्णवाहिका महापालिकेला हस्तांतरित केल्या. रुग्णवाहिका असोसिएशनतर्फे नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यानंतर सेवाभावी संस्थांना हस्तांतरित करण्यात येतील.

प्रारंभी कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी कोविड रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका तसेच ज्ञानदीप संस्थेतर्फे ऑक्सिजन यंत्र व कन्व्हर्टर यंत्र आदी साहित्य ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच पालकमंत्र्यांचे त्यांनी स्वागत केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement