Published On : Fri, Apr 9th, 2021

कंटेन्मेंट झोन अभावी कामठी तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढीवर

Advertisement

– मागील 2 महिन्यात 50 च्या वर कोरोणाबधित रुग्णांचा मृत्यू

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे नागरिकांना नाकी नऊ आले आहे.मागील वर्षी 12 एप्रिल 2020 ला कामठी तालुक्यातील पहिला कोरोनाबधित रुग्ण आढळला होता तर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2021 ला पहिला कोरोणाबधित रुग्ण आढळला असून आजपावेतो एकूण 6 हजाराच्या वरील रुग्ण कोरोनाबधित आढळले असून 200 च्या वर कोरोणाबधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात 16 फेब्रुवारीपासून ते आजपावेतो 3 हजाराच्या वरील रुग्ण कोरोणाबधित आढळले आहे.दुसऱ्या टप्प्यातील कोरोणाचा संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

तेव्हा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कितीही तारेवरची कसरत करीत असले तरी नागरिकांच्या असहकार्याने कामठी तालुक्यात कोरोना नियंत्रणात आणणे हे एक आव्हानच ठरत आहे.दररोज रुग्णसंख्या ही शंभरीच पार करीत आहे. वास्तविकता कामठी तालुक्यात दररोज आढळणारे कोरोनाबधित रुग्ण हे गृहविलिगीकरणाच्या नावावर बिनधास्तपणे मोकाट फिरत असल्याने प्रशासनाच्या अभयपणामुळे कोरोणाचा संसर्ग वाढीवर आहे. तसेच एखादा रुग्ण कोरोनाबधित आढळल्यास त्याच्या घरासमोर प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे फलक् लावून मोकळे होतात मात्र कोरोनाबधित रुग्ण लोकलाजेसाठी ते फलक काढून फेकून मोकाट फिरत आहेत परिणामी कोरोना वाढीवर आहे.पूर्वी कोरोणाबधित रुग्ण आढळल्यास तो परिसर कंटेन्मेंट झोन तयार करून त्या परिसरातील नागरिकास ये जा करण्यास प्रतिबंध करावे लागत होते मात्र आता हे कंटेन्मेंट झोन पद्धत बंद करीत असल्याने आता कोरोणाबधितांना मोकाट फिरण्यास सोयीचे झाले आहे यावरून कामठी तालुक्यात कंटेन्मेंट झोन अभावी कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढीवर आहे.

कामठी तालुक्यातील कोराडी-महादूला भागात कोरोनाचे रुग्ण वाढीवर आहेत येथील रुग्ण हे गृहविलीगिकरनाच्या नावावर घरी न राहता बिनधास्तपणे बाजारपेठेत फिरकत आहेत तसेच कामठी शहरातील कोरोनाबधित रुग्ण सुद्धा औषध मिळत नसल्याच्या नावाखाली शासकीय रुग्णालयात फिरताना दिसत आहेत त्यातच काही अलक्षणीय कोरोणाबधित रुग्ण सुद्धा मी पोजिटिव्ह आलो पण मला काही झालेच नाही या विचारसरनेतून घराबाहेर पडून आपल्या कोरोनाबधित रोगाचे निमंत्रण दुसऱ्याला देत आहेत.कामठी तालुक्यात मोकाट फिरणारे कोरोनाबधित रुग्णावर प्रशासनाने कंबर कसली नाही तर दिवसेंदिवस कोरोणाबधित रुग्णांची होणारी शंभरी ही दुप्पट होण्यास नाकारता येणार नाही आणि प्रशासन हतबल होईल मात्र कोरोना नियंत्रणात येणार नाही हे ही तितकेच सत्य आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने सुचविलेल्या त्रिसूत्री मार्गदर्शक सूचनांचे नागरीकानो पालन करावे यासाठी प्रशासन खुद्द रस्त्यावर उतरून कारवाही करीत आहेत त्यातच कामठी पोलीस स्टेशन चे 12 पोलीस कर्मचारी कोरोनाबधित आढळले त्यातच नागरिक कोरोनाची कुठंलिहि भीती न बाळगता प्रशासनाच्या कारवाही वर पाणी फेरण्याचे काम करीत आहेत.

कोरोनाचा प्रकोप इतका वाढला की खाजगी रुग्णालये फुल झाले आहेत रुग्णालयात व्हेंटिलेटर पुरेसे नाहीत , रुग्ण मरण पावत आहेत यापेक्षाही भयावह परिस्थिती येण्याचे संकेत आहेत तरी सुद्धा नागरिक सजगतेचीभूमिका न घेता निर्लज्जतेने वागणूक करीत कोरोना वाढीस कार्यरत आहेत यासाठी प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.तसेच यापुढे कोरोनाबधित रुग्ण परिसर कटेन्मेंट झोन केल्यास व तेथील नागरिकांवर प्रतिबंध लादल्यास नक्कीच कोरोनावर नियंत्रण साधण्यास सोयीचे होणार हे इथं विशेष!बॉक्स:-तहसीलदार अरविंद हिंगे:-यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी ने विचारपूस केले असता सदर बाबीसंदर्भात कंटेन्मेंट झोन लागू करण्यासंदर्भात विचाराधीन असून आता यापूढे एखाद्या परिसरात पाच पेक्षा जास्त कोरोनाबधित रुग्ण आढळल्यास तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून कंटेन्मेंट झोन लागू करण्यात येईल व त्या परिसरात लाकडी बॅरिकेट्स लावण्यात येईल व त्या परिसरातील नागरिकाना ये जा करण्यास प्रतिबंध राहणार असून हे कंटेन्मेंट झोन लवकरच सुरू करण्यात येतील.