Published On : Sun, May 24th, 2020

नागपुरात नरेंद्र नगर रहिवासी एका महिला डॉक्टरसह सहा रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूर : संस्थात्मक अलगीकरणक कक्षात रुग्णसेवा देणारी एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहे. या रुग्णासह आणखी सहा रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ४२३वर पोहचली आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या ३३६ झाली आहे.

आमदार निवासातील क्वारंटाइन सेंटरमध्ये १५ दिवसांपूर्वी या ‘बीएमएस’ महिला डॉक्टरची ड्युटी लावण्यात आली होती. त्यानंतर त्या सुटीवर गेल्या. शनिवारी जेव्हा त्याना लक्षणे दिसून आली तेव्हा त्या आमदार निवासात येऊन नमुना दिला. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नरेंद्र नगर येथील रहिवासी असलेल्या या डॉक्टरच्या कुटुंबाला क्वारंटाइन करण्यात आले आहे. या रुग्णासह मेयोच्या प्रयोगशाळेत मोमीनपुरा येथील दोन रुग्ण माफसूच्या प्रयोशाळेतून जवाहरनगर येथील दोन महिला तर एम्सच्या प्रयोगशाळेतून एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement