Published On : Sat, Jun 3rd, 2023

कोरोमंडल ट्रेन अपघात ; पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौऱ्यावर

अपघातग्रस्तांची घेणार भेट

ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक झाल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात २३८ हून जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये झालेल्या अपघातावर शोक व्यक्त केला. सर्व कार्यक्रम रद्द करून मोदी यांनी ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्पूर्वी मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशा अपघातासंदर्भात बैठक घेतली. आता त्यांनी ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात स्थळी ते जाणार आहेत तसंच जखमींची विचारपूसही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटकला जाणार आहेत. तिथे ते ओडिशा अपघातातल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement