Published On : Thu, Apr 25th, 2019

कन्हान परिसरात वीज वाहिन्यांच्या चोरीमुळे वीज पुरवठयावर परिणाम

Power Supply

File Pic

कन्हान आणि जवळपासच्या ग्रामीण परिसरात मागील काही दिवसापासून चोरटयांनी महावितरणच्या वीज वाहिन्यांना लक्ष केले असून परिणामी या परिसरातील अनेक वीज ग्राहकांना अखण्डित वीज पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे. सध्या कन्हान आणि पिपंरी परिसरातील १५ शेतकऱ्यांचा वीज पुरवठा यामुळे बंद आहे. महावितरणकडून येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

आपला जीव धोक्यात घालून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. या परिसरातील शेती पंपाला वीज पुरवठा करण्याऱ्या वीज वाहिन्यांना चोरटयांनी आपले लक्ष केले असून शेतकऱ्यांसोबतच महावितरणला देखील अखण्डित वीज पुरवठा ठेवताना नाकी नऊ येऊ लागले आहेत.

चालू वीज वाहिनी बंद करून सिमेंटचे वीज खांब जमिनीवर पाडतात. यातील ऍल्युमिनियमची वीज वाहिनी कापून चोरटे पसार होतात. एकट्या एप्रिल महिन्यात कन्हान परिसरात अश्या प्रकारच्या ३ घटना घडल्या असून यात महावितरणचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणात महावितरणकडून रीतसर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चालू वीज वाहिनीवर काम करणे हे धोकादायक आहे. पण चोरटे आपला जीव धोक्यात घालून आपला कार्यभाग साधत आहेत. ग्रामीण भागातील शेती पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेचे जाळे निर्माण केले आहे. शेती पंप बहुतांश ठिकाणी निर्जन आणि निर्मनुष्य ठिकाणी असल्याने चोरांचे फावले आहे. अश्या ठिकाणी सामान्य नागरिकांची वर्दळ नसते यामुळे चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत.

या अगोदर मागील वर्षी याचा काळात कन्हान परिसरात बंद असल्येल्या खंडेलवाल इंडस्ट्रीमधील महावितरणच्या क्युबिक मीटर बॉक्स मधील साहित्य चोरटयांनी लंपास केले होते. तसेच कन्हान-मनसर मार्गावरील निर्मनुष्य असल्येला ठिकाणी असलेल्या महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणारी टोळी मागील वर्षी दिवाळीच्या काळात सक्रिय होती. रोहित्रातील तेल चोरून नागपूर-जबलपूर मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना चोरलेले तेल विकण्याचे काम हे टोळी करीत होती. पण पोलिसांनी या टोळीचा छडा लावून त्यांचा योग्य बंदोबस्त केल्याने रोहित्रातील तेल चोरी होण्याच्या घटना बंद झाल्या आहेत.

Advertisement
Advertisement