Published On : Thu, Apr 25th, 2019

शासकीय निर्णयात अडकले पक्षी

अखेर पशु पक्षाच्या वाहतूकी प्रकरणी गुन्हा दाखल, शासकीय कुक्कुटपालन केंद्रात ठेवले पक्षी

नागपूर: ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीने पशु पक्षाची वाहतूक केल्याचे प्रकरण नागपूर रेल्वे स्थानकावर पशु प्रेमींच्या सतर्कतेने सोमवारी उघडकीस आले. चौकशीअंती लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. सोमवारपासून शेकडो पशु पक्षी शासकीय कुक्कुट पालन केंद्र, फुटाळा येथे ठेवण्यात आले आहेत. आता हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात आहे. पक्षी कोणाच्या ताब्यात द्यावेत यावर जिल्हाधिकारी निर्णय देणार आहेत. अद्याप जिल्हाधिकारी यांची भेट न झाल्याने शासकीय निर्णयात ते पक्षी अडकले आहेत.

घटनेच्या दोन दिवसानंतर बुधवारी हावडा येथून त्या पशू व पक्षांवर दावा ठोकणारे दोन इसम लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर झाले होते़ त्यांनी आमचे पशू व पक्षी आमच्या हवाली करा, अशी मागणी केली़ मात्र, हे प्रकरण आता जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारीत आहे. पक्षी कोणाला द्यावेत यावर तेच निर्णय देतील. तो पर्यंत सर्व पक्षी कुक्कुट पालन केंद्रात सुरक्षित ठेवले आहेत. बुधवारी मानद पशू कल्याण अधिकारी अंजली वैद्यार यांच्यासह लोहमार्ग पोलीसांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली़ मात्र, जिल्हाधिकाºयांची भेट होऊ शकली नाही़ त्यामुळे, हावडा येथून आलेले दावा ठोकणाºयांना रिकाम्या हाती परतावे लागले़ त्यानंतर, जोवर जिल्हाधिकारी या पशू व पक्षांबाबत ठोस निर्णय देत नाहीत, तोवर हे पशू व पक्षी शासकीय कुक्कूटपालन केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे, जिल्हाधिकारी याबाबत कोणता निर्णय घेतात, याब्बाात उत्सुकता लागली आहे़ लोहमार्ग पोलीसांनी पक्षांच्या वाहतूकीबाबत अज्ञात इसमाविरूद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा १९६० अन्वये कलम ११ (१)(घ)(ड) नोंदवण्यात आला आणि झिरोची केस नोंदवून हे प्रकरण हावडा जीआरपीकडे वळवण्यात आली आहे़.

त्यांच्या समोर प्रश्न
अशा पशु पक्षांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे नेहमीच रितसर नोंदणी करून रेल्वेच्या पार्सल बोगीने पशु पक्षांची वाहतूक केली जाते. सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार सोमवारी ही घटना उघडकीस आणल्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे मंगळवारी पक्षांची वाहतूक झाली. मात्र, पोलिसांना तसेच पशु प्रेमींना याबाबत माहिती नसल्याने पक्षी नियोजित स्थळी सुखरुप पोहोचले. पशु प्रेमींकडून नेहमीच आक्षेप घेतल्यागेला तर व्यवसाय करणे कठिण होईल, या भीतीने विक्री करणाºयांत भीती निर्माण झाली आहे.