Published On : Sat, Jun 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात थकीत पगारासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन कायम

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी सुरू असलेले कामबंद आंदोलन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. तीन महिन्यांपासून एल व सीएल रजेच्या पैशांचे देयक मिळाले नसून मागील महिन्याचा पगारही अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेतन आणि रजेच्या थकीत देयकांबाबत तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली. त्यानंतर ११ जूनपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासन किंवा संबंधित कंपनीकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. तसेच महानगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

वेळेवर वेतन मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे थकीत पगार आणि रजेच्या पैशांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, प्रलंबित वेतन आणि रजेचे पैसे मिळेपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपनीने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व पॉवरफंड वर्कर्स युनियनचे अध्यक्ष गौरव मेश्राम, सचिव रितेश तांगडे, सहसचिव केतन लांजेवार आणि सदस्य सनी चंद्रिकापुरे करीत आहेत.

Advertisement
रामरक्षा पाठ को लेकर BJP vs Uddhav ठाकरे आमने-सामने #UddhavThackeray #BJP #RamRaksha #Amravati

रामरक्षा पाठ को लेकर BJP vs Uddhav ठाकरे आमने-सामने #UddhavThackeray #BJP #RamRaksha...

Nagpur Murder Case: सुपारी किलिंग में बड़ा खुलासा #NagpurNews #MurderCase #SupariKilling #CrimeNews

Nagpur Murder Case: सुपारी किलिंग में बड़ा खुलासा #NagpurNews #MurderCase #SupariKilling #CrimeNews

संगम चॉल में हंगामा, पुलिस से हाथापाई #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #KnifeAttack #newsupdate

संगम चॉल में हंगामा, पुलिस से हाथापाई #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #KnifeAttack #newsupdate

समृद्धि महामार्ग पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #SamruddhiMahamarg #RoadAccident #AccidentNews #news

समृद्धि महामार्ग पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #SamruddhiMahamarg #RoadAccident #AccidentNews #news

एक ही बैंक में खोले 14 बैंक अकाउंट #vidarbhanews #nagpur #crimenews #maharashtranews #nagpurnews

एक ही बैंक में खोले 14 बैंक अकाउंट #vidarbhanews #nagpur #crimenews #maharashtranews...

महिला के विरोध पर ड्राइवर का गुस्सा! #NagpurNews #Crime #PoliceAction #ViralNews #MaharashtraNews

महिला के विरोध पर ड्राइवर का गुस्सा! #NagpurNews #Crime #PoliceAction #ViralNews #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges