Published On : Mon, Apr 30th, 2018

Bhandara: लाखनी राष्ट्रीय महामार्ग भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडले, 15 जण गंभीररीत्या जखमी

लाखनी (भंडारा): महामार्गावरील एका मंगल कार्यालयात लग्न आटोपल्यानंतर त्यासमोर उभे असलेल्या 20 ते 25 व-हाड्यांना एका भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजता लाखनी येथील ग्रेस लॅण्ड मंगल कार्यालयासमोर घडली.

अमित लांडगे (30), रोहित बांडेबुचे (27, रा.नागपूर), देवांशु भुसारी (5, रा. खोकरला) यांच्यासह 7 जणांची ओळख पटली नाही. लाखनी येथील जगनाडे कुटुंबीयांकडे लग्नकार्य होते. या लग्नासाठी नागपूरचे व-हाडी आले होते. लग्न आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी हे सर्व जण मंगल कार्यालयासमोर उभे होते. दरम्यान रायपूरकडून नागपूरकडे डाक विभागाची पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक (डब्ल्यू.बी.11/डी.3911) च्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्यावरचे कठडे तोडून या ट्रकने व-हाड्यांना चिरडले.

या अपघातात जागीच 10 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडून आहे. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. वृत्त लिहीपर्यंत मृतांची नावे कळू शकली नाहीत. जखमींवर उपचार करण्यासाठी लाखनीतील खासगी डॉक्टरांसह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची चमू उपचार करीत आहे.

More details are awaited