Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Nov 26th, 2020

  संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

  महापौर संदीप जोशी यांनी केले डॉ.आंबेडकर स्मारकस्थळी वंदन

  नागपूर : भारतीय संविधान दिनानिमित्त नागपूर शहराचे महापौर तथा नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांनी गुरूवारी (ता.२६) संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महापौर संदीप जोशी यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून वंदन केले.

  याप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, उपमहापौर मनीषाताई कोठे, भाजपा प्रदेश सचिव तथा विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, अशोक मेंढे, माजी आमदार डॉ. मिलींद माने, पिंटू झलके, अश्वीनी जिचकार, सतीश शिरसवान, ॲड. राहूल झांबरे, राजेश हाथीबेड, नेताजी गजभिये, दिलीप गोईकर, मनीष मेश्राम, संदीप गवई, अतुल सुखदेवे, सतीश डागोर, राजू चव्हाण, जयसिंग कछवाह, गिरीश देशमुख, प्रदीप मेंढे, आदर्श वाशिमकर, अजय बागडे, रणजीत गौरे उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145