Published On : Thu, Nov 26th, 2020

संदीप जोशी यांना लोकजागृती मोर्चा चे समर्थन

Advertisement

नागपुर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांना लोकजागृती मोर्चा या प्रखर राष्ट्रवादी संघटनेने आपले समर्थन जाहीर केले आहे.

संदीप जोशी हे राष्ट्रवादी विचारसरणीचे व्यक्ती आहेत तसेच ते उत्तम नेते समस्यांची जाण असलेले उमेदवार आहेत. त्यांच्या विजयामुळे निश्चितच पदवीधरांच्या समस्या, शिक्षकांच्या समस्या, बेरोजगारीच्या समस्या यावर मार्ग निघेल असा विश्वास यावेळी संघटनेचे संयोजक अँड. रमण सेनाड यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Mar 18 2026 - Time 10.31Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,400/-
Gold 22 KT ₹ 1,45,500 /-
Silver/Kg ₹ 2,49,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रातील लोकजागृती मोर्चाचे मोर्चेकरी त्यांच्या विजयासाठी भरभरून प्रयत्न करतील. तसेच सर्व मतदारांनी तरुण तडफदार उमेदवार संदीप जोशी यांना प्रथम पसंतीचे मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहनही यावेळी अँड. रमण सेनाड यांनी केले. याप्रसंगी डॉ. श्रीरंग वराडपांडे, राजेश घिवदोंडे अँड. राजेंद्र राजेन्द्र गिल्लुरकर, शैलेंद्र गाडगे, शुभम शुक्ला, स्वप्निल वऱ्हाडे, ऋग्वेद सेनाड, प्रभाकरराव मांगलेकर, संजय चिंचोळे, भाऊ भोयर, नरेश राऊत, संजय काळे, गौरव शहाकार, ओंकार सेनाड, आनंद पांढरे, सुरोजित कर्माकर, विभव महाजन, विनोद लांजेवार, गयाराम खालगोने, प्रवीण घुले, राकेश माटे, सतीश बैस इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement