Published On : Mon, Nov 26th, 2018

संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामुहिक वाचन

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाचे आयोजन

नागपूर: संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आम्ही,भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्यासोबतच सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनितीक न्याय असलेल्या संविधान उद्देशिकेच्या सामुहिक वाचनाने सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी,उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, अविनाश कातडे,श्रीमती विजया बनकर, श्रीमती गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलींद नारिंगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.