Published On : Tue, Nov 27th, 2018

चंद्रपुर जिल्हा व सत्र न्यायालयेत संविधान दिवस संपन्न

Advertisement

दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ ला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन तर्फे संविधान दिवस साजरा केले गेले आणि या उपलक्ष निम्मित भारतीय संविधान वर व्याख्यानचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षता आणि प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. शरद आंबटकर द्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननिय जाधव साहेब सिविल जज, सिनियर डिविजन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर हे होते. या व्याख्यानचे प्रमुख वक्ता ॲड. श्री. भीमराव रामटेके होते. या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती डी.जि.पी. घट्टूवार होते. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड. संदीप नागपुरे यांनी केले.

या कार्यक्रमात विविध वक्तांनी भारतीय संविधान बद्दल आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री. ॲड. भीमराव रामटेके यांनी भारतरत्न डॉ. भीमरावजी रामजी आंबेडकरानी २ वर्ष ११ महिने १८ दिवसांत, संविधान लिहून २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेस सुपूर्द केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरकृत भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमेटीचे चेअरमॅन होते व भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क, समानतेचा हक्क आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यचे हक्क अंकित आहे असे उपस्थित अधिवक्तांना संभोधित केले.

या कार्यक्रमात सर्व उपस्थित अधिवक्तांनी उपोदघात शपथ (प्रिएमबल ओथ) घेतली. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ॲड.प्रकाश बजाज यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे कोषाध्यक्ष ॲड. नितीन गटकिने व ग्रंथपाल ॲड. सुजित गेडाम, सह-सचिव ॲड. निलेश दलपेलवार, कार्यकारी सदस्य ॲड. श्रीकांत कवटलवार, ॲड.मोहारकर, ॲड.हजारे, ॲड.घरडे, ॲड.इंदूरकर, ॲड.खोब्रागडे, ॲड.कांचन दाते उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयचे वरिष्ठ अधिवक्ता ॲड.भुसारी, ॲड.आवारी, ॲड.हुसेन, ॲड.विक्रम टंडन, ॲड.पूजा काकडे, ॲड.मनीषा पिपारे, ॲड.उमेश यादव, ॲड.मनोज मांदाडे, ॲड.पाठक, ॲड.घोडेश्वर, ॲड.कवाडे, ॲड. जामदार, ॲड. मसादे व इतर मान्यवर अधिवक्ता उपस्थित होते.