Published On : Tue, Jul 16th, 2019

कन्हान ला भुलबा तेजस-भुलबी तेजस्विनी चा लग्न सोहळा संपन्न

कन्हान : – आषाढी च्या शुभ पर्वावर कन्हान येथील पडोळे व गजभिये परिवारा व्दारे कन्हान ला भुलबा-भुलबीचा लग्न सोहळा थाटात साजरा करण्यात आला. सोमवार (दि.१५) ला सायंकाळी गणेश नगर कन्हान येथील चंद्रशेखर पडोळे यांच्या राहत्या घरी उपस्थित पाहुणे मंडळीना चाय नास्ता करून वर भुलबा तेजस पडोळे यांची बॉंडबाज्या सह वरात काढुन हनुमान नगर कन्हान येथील प्रभाताई गजभिये यांच्या राहत्या घरी लग्न वराती पोहचल्यावर सर्व पाहुणे मंडळीचे पुष्पगुच्छ व चहा वितरण करून स्वागत करण्यात आले.

वर भुलबा चे मामा अनिल आष्टणकर व मामी करूणाताई आष्टणकर हयानी नवरदेव भुलबा तेजस पडोळे यास आणले व वधु भुलबी चे मामा प्रदीप देशमुख व मामी अर्चना देशमुख हयानी नवरी भुलबी तेजस्विनी गजभिये हीला लग्न मंडपी आणुन भुलबा नवदेव तेजस संग भुलबी नवरी तेजस्विनी यांचा प्रभाकरजी कैकाडे व छबुबाई कैकाडे हयानी मंगलाष्टके म्हणुन शुभ विवाह संपन्न केला.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शुभ प्रसंगी वर भुलबा तेजस ची आजी कांताबाई भुरे , अनिताताई पडोळे , काका शैलेश दिवे , दिनेश ढोले, भुलबी वधु चे आजोबा रायभानजी देशमुख, आजी लिलाबाई देशमुख, मनिष वैद्य, स्वाती वैद्य, चोपकर, जयपुरकर, दारोडे, कैकाडे , भिवगडे परिवाराच्या मंडळीने भुलबा-भुलबी चे लग्न लावुन शुभ आर्शिवाद दिले. तद्नंतर उपस्थित सर्व पाहुणे मंडळीला जेवन देऊन हनुमान नगर कन्हान येथे भुलबा-भुलबी चा लग्न सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement