Published On : Tue, Jul 16th, 2019

चार जबरी चोरट्याना अटक, 80 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भिलगाव -रनाळा रोड वर भिलगाव रहिवासी राहुल गणवीर नामक तरुणाला चार अज्ञात तरुणांनी तिन दुचाकीवर येऊन चाकूच्या धाकावर एम आई कंपनीचा एक मोबाईल व नगदी 4 हजार 500 रुपये बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची घटना 15 जून ला रात्री साडे दहा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी राहुल गणवीर वय 30 वर्षे रा भिलगाव ता कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 392, 34 अनव्ये गुन्हा नोंदविला होता या गुन्ह्याच्या तपासाला दिलेल्या गतोवरून या चार जबरी चोरट्यांचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या चारही आरोपी कडून 80 हजार 100 रुपयांचा मुद्वेमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपीमध्ये मो अल्ताफ मो अन्सारी वय 20 वर्षे रा अरविंद नगर, अरबाज अमिरुल शेख वय 19 वर्षे रा कळमना, नफिस अन्सारी खुर्शीद अन्सारी वय 18 वर्षे रा यशोधरा,अंकुश ठाकूर वय 20 वर्षे रा जरीपटका नागपूर असे आहे. या आरोपिकडून चोरीस गेलेला एम आई कंपनीचा मोबाईल किमती 10 हजार रुपये, एकटीवा गाडी क्र एम एच 49 बी डी 5606 किमती 40 हजार रुपये, हिरो स्प्लेण्डर प्लस गाडी क्र एम एच 49 ए वाय 1906 किमती 30 हजार रुपये , व एक धारदार चाकू किमती 100 रुपये असा एकूण 80 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

…ही यशस्वी कारवाहो डीसीपी हर्ष पोद्दार, एसीपी राजेश परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर, डी बी स्कॉड चे पप्पू यादव,मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजा टाकळीकर, सुधीर कनोजिया, सतीश ठाकूर, ललित शेंडे, महेश नाईक, पोलिस शिपाई उमेश यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी