Published On : Thu, Aug 3rd, 2017

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी शुभारंभ

मुंबई: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजयाने सुरुवात केली असून वॉर्ड क्र. 22 मधून काँग्रेसच्या उमेदवार उमा विश्वनाथ सपार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उमा सपार यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने उमा सपार बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

सदर सुरुवात ही मीरा भाईंदर महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकणार याचे निदर्शक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.