Published On : Thu, Nov 7th, 2019

बोगस मतदानाविरोधात कांग्रेस चे तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर

Advertisement

बोगस मतदान न वगळल्यास दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

कामठी :-नुकत्याच कामठी तालुका निवडणूक प्रशासनाच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत वडोदा-भुगाव सर्कल, बिडगाव, तसेच केम तरोडी, चिकना, टेमसना , आसोली, महालगाव, दीघोरी, गादा गावातील बोगस मतदारांचे नावे पूर्ववतरीत्या अजूनही कायम असून ऑनलाईन मतदानाच्या माध्यमातून हजारो बोगस मतदान टाकण्यात आले तेव्हा उपरोक्त गावातील बोगस मतदान हे अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी मतदान यादीतून वगळून लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा द्यावा आणि बोगस मतदानाच्या आधारावर निवडणुका होत असतील तर लोकशाहीचा खरा खून होत असून हिटलरशाही चा वाव आहे आणि ह्याच हिटलर शाहीच्या आधारावर आगामी निवडणुका होत असतील तर निवडणुका घ्यायच्याच कशाला , मागील आठ वर्षे मुदतवाढ मधून बक्षीस म्हणून मनमानी करून सत्ता भोगली आताही तसेच करा…

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

.असा टोला तालुका निवडणूक प्रशासनाला लावीत मतदान यादीतून बोगस मतदान न वगळल्यास तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा कामठी तालुका महिला (ग्रा) कांग्रेस कमिटी च्या अध्यक्षा प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, कांग्रेस कामठी तालुका अध्यक्ष नाना कंभाले, ललित ढोले यांच्या नेतृत्वात कामठी चे नायब तहसीलदार रणजित दुसावार यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातन देण्यात आला .

वडोदा-भुगाव सर्कल मध्ये 1500 मतदारांची नावे दुबार नोंदणी आहे, बिडगाव येथे 185 मतदाता दुबार आहेत,केम, टेमसना, तरोडी, चिकना या गावांमध्ये 1000 पेक्षा जास्त मतदान आहेत यासंदर्भात प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, अतुल बाळबुधे यांनी न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केल्या होत्या या उच्च न्यायालयाच्या आदेशाने बोगस नावे वगळण्यात आले मात्र पुन्हा बोगस मतदान टाकून निवडणुका प्रभावित करण्याचा डाव आहे.

विशेषता तरोडी या गावातील मतदान परसाड, लिहिगाव,बिडगाव या गावातील याद्यांमध्ये बोगस नावे टाकण्यात आलेले आहेत तर तरोडी गावतील मतदार यादीत 198 अनोळखी बाहेरचे मतदान आहेत तसेच आसोली गावात 187 , महालगाव गावातील 338, दिघोरी गावातील 114, गादा गावात 53 बोगस मतदान आहेत तेव्हा निष्पक्ष पद्धतीने आगामी निवडणुका व्हाव्यात यासाठी अंतिम मतदान यादी जाहीर होण्यापूर्वी आक्षेपार्थ केलेले बोगस नावे मतदान यादीतून वगळण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे यांनी दिलेल्या सामूहिक निवेदनेतून केले आहे.

याप्रसंगी कामठी तालुका कांग्रेस अध्यक्ष नाना कंभाले,दिनेश ढोले,आशिष मल्लेवार,मनोहर कोरडे,अतुल बाळबुधे, गनेश महल्ले,सचिन चिकटे, विजय खोडके, अमोल खोडके, नंदकिशोर खेटमले, रातिरंग गावंडे,दुर्योधन साळवे,विक्की साळवे,विलास मोहोड, कोठीराम महल्ले, मनोज कुतथे, नामदेवराव वाघ,वैभव देऊळकर, रंगराव भोयर,रमेश गावंडे,आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement