Published On : Thu, Nov 7th, 2019

त्या वृध्दाची महिलांनी केली धुलाई

Advertisement

– डॉक्टर तपासणीत भंडाफोड
– माणुसकीला कलंकीत करणाèया घटनेमुळे प्रचंड खळबळ

नागपूर: जनरल स्टोअर्स चालविणाèया एका वृध्दाने (६२) चिमुकलीवर तीनदा अत्याचार केला. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानातच तोंड काळे केले. डॉक्टरकडे जाताच या घटनेचा भंडाफोड झाला. हा प्रकार उघडकीस येताच महिलांनी त्याची चांगलीच धुलाई केली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी नराधम वृध्दाविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे. गुल्लुबाबा उर्फ उमेश शंकरराव गुरलवार (रा. इंदोरा, जरीपटका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. माणुसकीला कलंकीत करणाèया घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती आहे. न्यायालयाने ११ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वृध्द आरोपी वनविभागात कार्यरत होता. काही कारणास्तव त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली. पत्नीसोबत पटत नसल्याने काही वर्षांपूर्वी तो पत्नीपासून वेगळा झाला. इंदोरा परिसरातील नातेवाईकांच्या घरी तो पेर्इंग गेस्ट होता. जवळच त्याने एक दुकान (एकच रुम) किरायाने घेतले होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो जनरल स्टोअर्स चालवित होता. परिसरात राहणाèयांनी दिलेल्या माहिती नुसार त्याचे दुकान दिवसभर सुरू राहायचे. जनरल स्टोअर्स असल्याने लहान मुलांची त्याच्या दुकानात वर्दळ होती. काही मुलांना तो चॉकलेटही द्यायचा.

पीडित ११ वर्षीय मुलगी ही सहाव्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील खाजगी काम करतात. अल्पवयीन मुलगी शालेय साहित्य तसेच इतर वस्तु घेण्यासाठी नेहमीच त्याच्या दुकानात जायची. तेव्हापासून वृध्दाची तिच्यावर नजर होती. सप्टेबर महिन्यात दुपारच्या सुमारास ती पेन विकत घेण्यासाठी त्याच्या जनरल स्टोअर्समध्ये गेली. तिला एकटी पाहून वृद्ध गुल्लुबाबाची नियत फिरली. दुकानाच्या आत बोलावून तिला चर्चेत गुंतविले. काही वेळातच तिला चॉकलेट दिले आणि जवळ घेण्याचा प्रयत्न केला. एकापेक्षा एक चॉकलेटचे तिला आमिष देत होता. घटनेच्या दिवशीही वृध्दाने तिला चॉकलेट दिले. आत बोलावून अश्लिल चाळे करीत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेबाबत कुणाजवळही न सांगण्यासाठी तिला दम दिला. तिने भीतीपोटी आईवडीलांना या प्रकाराची माहिती दिली नाही.

यानंतर ती पुन्हा दुकानात गेली असता वृध्दाचे तोच प्रकार केला. ३ नोव्हेंबरला दुपारी पीडित मुलगी पुन्हा त्याच्या दुकानात गेली. त्यावेळीही गुल्लुबाबाने पुन्हा तिला दुकानात ओढले. चॉकलेटचे आमिष देवून पुन्हा अत्याचार केला. एकूनच त्याने तीनदा चिमुकलीवर अत्याचार केला. मात्र, यावेळी घटनेचा भंडाफोड झाला. आईने मुलीसह जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून गुल्लुबाबा गुरलवार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली.

असा झाला भंडाफोड
अचानक चिमुकल्याची प्रकृती बिघडली. तिला दुखायला लागले. त्यामुळे आई तिला डॉक्टरकडे घेवून गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. डॉक्टरांनी तिला विश्वासात घेवून विचारपूस केली असता भंडाफोड झाला.

महिला संतापल्या
घटनेची माहिती मिळताच संतप्त महिलांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याच्या दुकानात लहान मुले जायचे. त्यामुळे आपल्याही मुलींशी त्याने अश्लिल चाळे तर केले नाही, याविषयी पालकांकडून मुलींची विचारपूस सुरु आहे. महिलांसाठी हा qचतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुलींना एकटे सोडू नका, अनोळखी व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट स्पर्शाची मुलांना जाणीव करून द्या, वेळोवेळी मुलांची आस्थेनी विचारपूस केल्यास अशा घटनांवर वेळीच आळा घालता येईल.

तो होता पेईंग गेस्ट
पत्नीपासून तो वेगळा झाला. त्याला आधार पाहिजे होता. त्यामुळे तो नातेवाईकांकडे राहायला गेला. नातेवाईकांनाही त्याने आपली संपत्ती देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे नातेवाईक त्याला पेइंग गेस्ट म्हणून ठेवत असले तरी बरेच दा तो दुकानातच झोपायचा.