Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राम मंदिरावरील कथित गैरव्यवहारांवरून भाजपवर काँग्रेसचा हल्लाबोल; निष्पक्ष चौकशीची नागपुरात सुप्रिया श्रीनेत यांची मागणी

Advertisement

नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत राम मंदिराशी संबंधित कथित चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मौन बाळगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

श्रीनेत म्हणाल्या की, राम मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. काँग्रेस कोणाच्याही श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. मात्र, मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहारांच्या आरोपांबाबत सत्य देशासमोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार या विषयावर पारदर्शक भूमिका घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींना जाब विचारला गेला पाहिजे, असेही नमूद केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.