Published On : Mon, Jul 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात काँग्रेसमध्ये गटनेतेपदावरून पुन्हा संघर्ष; विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर राजकीय भवितव्य ठरणार?

Advertisement

नागपूर : महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या वादाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार काँग्रेसचे ११ नगरसेवक विभागीय आयुक्तांसमोर हजर झाल्यानंतर आता गटनेतेपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे नेते राजेश अडुर यांनीही स्पष्ट भूमिका मांडत विभागीय आयुक्तांनी केवळ संख्याबळावर नव्हे, तर कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचाही विचार करावा, अशी मागणी केली.

राजेश अडुर म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे सर्व ११ नगरसेवक आज उपस्थित होते. गटनेतेपदाचा निर्णय हा फक्त बहुमताच्या आकड्यांवर आधारित नसून, मागील निर्णयावर न्यायालयाने स्थगिती का दिली होती, याचाही गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विनोद लभाने आज उपस्थित नसले तरी ते काँग्रेसचेच नगरसेवक असून २७ नगरसेवकांच्या संख्येत त्यांचा समावेश असल्याचेही अडुर यांनी स्पष्ट केले.

पुढे या प्रकरणात पुन्हा न्यायालयात जाणार का, असा प्रश्न विचारला असता, “प्रथम विभागीय आयुक्तांचा निर्णय येऊ द्या, त्यानंतर पुढील भूमिका ठरवू,” असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

Advertisement

गटनेतेपदाच्या या संघर्षामुळे नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले असून, आता विभागीय आयुक्तांचा निर्णय हा केवळ एका पदाचा नाही, तर स्थानिक काँग्रेसच्या राजकीय समीकरणांचाही निर्णायक ठरणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.