नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्ष एकसंघ असल्याचा दावा करत उमेदवार अतुल लोंढे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून ८३६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
आसिफ शेख यांनी सकाळी लवकर मतदान करून नागरिकांना मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सर्व मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शेख म्हणाले की, काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते एकत्र असून पक्षाचा उमेदवार अतुल लोंढे निवडणूक मैदानात ठामपणे उभा आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले.
“मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतील आणि अतुल लोंढे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा विश्वास आसिफ शेख यांनी व्यक्त केला.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





