नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेतील सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोल करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला.
नागपूर विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित जागांवरही महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये काँग्रेसला मर्यादित मते मिळतील, तर विदर्भात महायुतीचे वर्चस्व राहील, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेतील नाराजीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षातील खदखद आता बाहेर येत आहे. लोकप्रतिनिधींना मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सत्तेची गरज असते. सरकारमध्ये नसल्यामुळे कामे करता येत नसल्याची भावना अनेक आमदार-खासदारांमध्ये निर्माण झाली आहे. नेतृत्वाशी संवादाचा अभाव आणि अपेक्षा पूर्ण न झाल्याने नाराजी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत अशा प्रकारची भाषा योग्य नसल्याचे सांगितले. केवळ पैशांसाठी लोकप्रतिनिधी पक्ष बदलतात, हा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून आमदार-खासदारांना पक्षात आणण्यासाठी कोणतीही मोहीम सुरू नसल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, भाजपकडे संघटनात्मक ताकद आणि पुरेसे संख्याबळ आहे.
इथेनॉल धोरणावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. इथेनॉलमुळे देशाचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार असून, काही घटकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




