नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ८३६ लोकप्रतिनिधी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
मतदानासाठी जिल्ह्यात १४ केंद्रांची उभारणी करण्यात आली असून सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे.
ही निवडणूक केवळ रिक्त जागा भरण्यापुरती मर्यादित नसून स्थानिक राजकारणातील ताकद, पक्षीय संघटनांची पकड आणि लोकप्रतिनिधींचा कल याचीही चाचणी मानली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे.
मतदानानंतर मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात बचत भवन येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. २२ जून रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर या राजकीय लढतीचा निकाल स्पष्ट होईल.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





